कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला यश

December 30, 2008 3:39 PM0 commentsViews:

30 डिसेंबर बेळगावकर्नाटक पोटनिवडणुकीत 5 जागा जिंकून भाजपनं विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलंय. सत्ता स्थापली तेव्हा भाजपकडं 110 जागा होत्या. त्यामुळे त्यांना अपक्षाची मदत घेऊन सत्तेत यावं लागलं होतं. 224 जागांच्या विधानसभेत त्यांना बहुमतासाठी 114 जागांची गरज होती. आता भाजपकडे 115 जागा झाल्या आहेत.त्यामुळे त्यांनी सभागृहात पूर्ण बहुमत मिळवलंय. 8 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं 5, तर धर्मनिरपेक्ष जनता दलानं 3 जागा पटकावल्या.

close