नागपुरात इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या 11 वर

February 3, 2012 12:19 PM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

नागपूरच्या कळमना भागात सोमवारी कोसळलेल्या सहा मजली इमारतीचं ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू आहे. आज दुपारपर्यंत आणखी तीन मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आता मृतांची संख्या अकरा झाली आहे. अजुनही आठ ते दहा लोकं ढिगार्‍याखाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैन्याचे जवान, अग्नीशामक विभाग, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने अहोरात्र ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. आजचा पाचवा दिवस आहे मात्र तरी सुध्दा ढिगारा पूर्ण पणे उपसला गेलेला नाही.

close