शिवसेनेच्या उमेदवाराचे मतदान यादीतून नाव गायब

February 3, 2012 8:22 AM0 commentsViews: 1

03 जानेवारी

नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवार सपना मगर यांचं नावच मतदार यादीतून गायब झाल्याची पक्षाची तक्रार आहे. याबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करुनही प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेच्या पायर्‍यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मगर यांचे नाव प्रारुप मतदार यादीत होतं, मात्र त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीतून गायब झालं आहे. यासाठी संबंधितांनी कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत दाद मागितली, मात्र नाशिक महापालिका प्रशासन दाद देत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

close