दसरा मेळावा हा परंपरेचा भाग: शिवसेना

February 3, 2012 12:44 PM0 commentsViews: 4

03 फेब्रुवारी

शिवसेनेला दसर्‍या मेळाव्याला कशी परवानगी दिली असा सवाल विचारणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिवसेनेनं लगेच समाचार घेतला.बाळासाहेबांची तुलना कुणीही करू नये आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हा परंपरेचा भाग आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत राज ठाकरे सुध्दा या मेळाव्याला हजर राहत होते. पण शिवाजीपार्कचा सायलेन्स झोनचा दर्जा उठवावा ही शिवसेनेची सुध्दा भूमिका आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची सुरूवात यामैदानापासून झाली होती. तसेच राजकीय सभांना शिवजीपार्क उपलब्ध करून द्याव ही शिवसेनेची सुध्दा भूमिका आहे असं स्पष्ट मत सेनेनं एका पत्रकाव्दारे स्पष्ट केलं.

close