निष्ठावंताना ठेंगा,राज्यमंत्र्यांच्या पतीराजांना उमेदवारी

February 4, 2012 9:45 AM0 commentsViews: 6

04 फेब्रुवारी

नाशिकमध्ये सर्वाचे लक्ष लागलेल्या प्रभाग आठ मध्ये उमेदवारीची माळ अखेर राज्यमंत्र्यांच्या पतीराजाच्या गळ्यात पडली आहे. पंचवटीतील वार्ड नंबर – 8 मध्ये आपल्या पतीला उमेदवारी मिळावी यासाठी माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी मोठा प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक गुरमित बग्गा यांचा एक कार्यक्षम आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून दावा होता. थेट मुख्यंमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारात हा वाद पोहचला होता. शेवटी बग्गा यांना काँग्रेस पक्षाने वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. बग्गा यांनी आता काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याच ठरवल असून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत.

close