नक्षलवादाची निर्मिती मंत्रालयातूनच होते – डॉ.अभय बंग

February 4, 2012 10:49 AM0 commentsViews: 16

04 फेब्रुवारी

नक्षलवादाची निर्मिती ही गडचिरोलीत नाही तर मुंबईतल्या मंत्रालयात होते, असं परखड मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलं आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसेचं समर्थन कधीच होऊ शकत नाही मात्र तो का वाढतो याच्या कारणांचा मुळातून शोध घेतला पाहिजे असंही ते म्हणाले. चंद्रपूर इथ सुरू असलेल्या साहित्य संमेलनात झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी आज ''नक्षलवाद, लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती आणि मराठी साहित्य'' या विषयावर परिसंवाद झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. बंग यांनी हे वक्तव्य केलं.

close