युद्धाच्या भूमिकेबाबत पाकिस्तान बॅकफूटवर

December 30, 2008 4:43 PM0 commentsViews: 1

30 डिसेंबर नवी दिल्लीविशाल थापरपाकिस्तानने आपल्या युद्धाच्या भूमिकेपासून पुरतं घूमजाव केलं. युद्धावर बोलण्यापेक्षा भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन मुंबई हल्ल्याचं योग्य संशोधन करावं असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. पण याचवेळी भारताने सीमेजवळ सैन्याची जमवाजमव केली आहे आणि मुंबई हल्ल्यांची कोणतीही माहिती आम्हाला दिली नाही असे आरोपही त्यांनी केले आहेत. दोन्ही देशांमधलं वाक्‌युद्ध सुरू असलं तरी महत्त्वाचं म्हणजे युद्धाची शक्यता सध्या तरी मावळली आहे.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध होता, हे सिद्ध करणारे कित्येक खात्रीलायक पुरावे भारताकडे आहेत. अतिरेक्यांनी केलेले कॉल्स, त्याचे पाकिस्तानमधल्या नंबरवर झालेलं संभाषण आणि अजमल कसाबची कबुली. पण तरीही पाकिस्तान ते दहशतवादी पाकिस्तानी आहेत हे मान्य करणाच्या मनस्थितीत अजूनही नाही. अमेरिका आणि चीनच्या दबावामुळे पाकिस्तानने युद्धाची भाषा बंद केली. या गोष्टीचं भारताने स्वागत केलं आहे. पण या बाहेरच्या देशांनी भारत-पाकच्या द्विपक्षीय मुद्यात ढवळाढवळ करू नयेअसा इशाराही मुखजीर्ंनी दिलाय. कारण काश्मीर मुद्यात मध्यस्थी करण्याचे मनसुबे अमेरिकेचे भावी अध्यक्ष बराक ओबामा यांनी बोलून दाखवले आहेत.

close