‘पु.लं.ची म्हैस’ जिल्हा न्यायालयात

February 4, 2012 3:27 PM0 commentsViews: 16

04 जानेवारी

पु.लं.च्या साहित्यिक म्हशीचा नक्की मालक कोण हा वाद थेट पुणे जिल्हा न्यायालयात पोहचला आहे. पुणे जिल्हा न्यायालयाने दोन्ही चित्रपट निर्मात्यांना 8 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याची नोटीस दिली आहे. कारण पु.लं. देशपांडे यांच्या गाजलेल्या म्हैस या पुस्तकावर सध्या तीन सिनेमे तयार होतायेत. त्यातला एक सिनेमा पूर्ण झाला आहे. तर दुसर्‍याचा मुहूर्त झाला आहे आणि तिसर्‍या सिनेमाची तयारी सुरु झाली आहेत.

दिग्दर्शक शेखर नाईक यांनी 2008 ला गोळाबेरीज या पुस्तकातल्या 'म्हैस' कथेचे सर्व हक्क सुनीता देशपांडे यांच्याकडून रीतसर घेतल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. म्हैस या नावाने त्यांच्या सिनेमाचे रजिस्ट्रेशन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे केलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. पण म्हैस या कथेवर आधारित प्रभाकर फिल्म्स निर्मित चांदी या सिनेमाचा मुहूर्त नुकताच झाला आहे. तर क्षितिज झारापकर दिग्दर्शित गोळबेरीज हा सिनेमा पु.लंच्या आयुष्यावर बेतलेला असून त्यातही म्हैस पुस्तकाचा संदर्भ आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत पु,लंची म्हैस गाजणार असं दिसतं आहे.

close