उमेदवारांवर जीवघेणे हल्ले

February 6, 2012 8:41 AM0 commentsViews: 4

06 फेब्रुवारी

राज्यात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर उमेदवारांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहे. नाशिकमध्ये सीपीएमचे उमेदवार हेमंत पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला. कळवण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी करत आहेत. पक्षाची बैठक संपल्यावर परतत असताना त्यांची गाडी आडवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार आहे. पाटील यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाटील यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील बिरारी यांच्यासह आठ जणांच्या विरोधात सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मानूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार दशरथ वनवे यांच्यावर काल मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्यात ते गंभीर जखमी झाले असून शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश धस यांनी केला असल्याचा आरोप वनवे यांनी केला. या हल्ल्यात वनवे यांच्यासह दोन जण जखमी झाले असून त्यांच्या दोन्हीही गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन तलवार, हॉकिस्टीक, काठ्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहे.

close