26/11चे दहशतवादी पाकिस्तानी असू शकतात- महमूद अली दुरानी

December 30, 2008 4:53 PM0 commentsViews: 9

30 डिसेंबर मुंबई हल्ल्यातले दहशतवादी पाकिस्तानी असू शकतात, असं पाकिस्ताननं आता कबूल केल्याचं दिसतंय. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुरानी यांनी सीएनएन-आयबीएला एक्सक्लूजिव्ह इंटरव्ह्यू दिला. त्यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्यात पाकिस्तानच्या नागरिकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सांगितलं. पाकिस्तानच्या एखाद्या अधिका-यानं पहिल्यांदाच अशी कबुली दिली आहे. पण, भारतानं सुरवातीला तपास पूर्ण करावा, असंही ते म्हणाले. आतापर्यंत भारतानं मुंबई हल्ल्याबाबत कोणतेही पुरावे दिले नसल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तानही भारताप्रमाणेच दहशतवादाचा बळी पडत असल्याचं दुरानी यावेळी म्हणाले.

close