निवडणुकांच्या तोंडावर दारुच्या 138 पेट्या जप्त ; 7 जण ताब्यात

February 6, 2012 10:40 AM0 commentsViews: 3

06 फेब्रुवारी

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदान एक दिवसावर येऊन ठेपलं असताना आज राज्यात ठिकठिकाणी दारु आणि पैसै वाटण्याच्या घटना समोर येत आहेत. बुलडाणा इथ पैसै वाटतांना काही काँग्रेस कार्यकर्त्यांनावर गुन्हा दाखल झाला आहेत. यवतमाळ जिल्हात झुली गावात पोलिसांनी दारुच्या 38 पेट्या जप्त केल्या. ही दारु मतदारांना वाटण्यासाठी जात असल्याचा संशय आहे. परभणीतही 2 लाख रुपये किंमतीची दारु पकडण्यात आली. तर लातूरमध्ये अहमदपूर तालुक्यातील दारुच्या 100 पेट्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. नानल इथं पोलिसांनी 2 गाड्या आणि 7 जणांना ताब्यात घेतले आहे. जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा उमेदवार रमेश बस्सी आणि काही समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या हरतुले गावातही दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.

close