मराठी पाट्या लावण्याची बेळगाववासियांची मोहिम

February 6, 2012 10:55 AM0 commentsViews: 11

06 फेब्रुवारी

बेळगावमध्ये मराठीचा लढा देणार्‍या बेळगाववासियांनी एक नवी मोहीम सुरू केली आहे. मराठीची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बेळगावमधल्या एका मंडळाने घरांवर मराठी नामफलक लावायला सुरुवात केली आहे. घरावरच्या पाट्या, चौकातील फलक मराठीत लावण्याचा उपक्रम बेळगाव शहरातल्या कालिकादेवी युवक मंडळाने सुरू केला आहे. या उपक्रमला नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपुर्वी बेळगावमध्ये काळा दिनात महापौर आणि उपमहापौर यांनी सहभाग घेतल्यामुळे कर्नाटक सरकारने त्यांना निलंबित केले तसेच महापालिकाही बरखास्त करण्यात आली. आता पुन्हा एकदा बेळगावचा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे.

close