पोलीस कर्मचा-यांबरोबरच त्यांचं कुटुंबसुद्धा त्रस्त

December 30, 2008 5:18 PM0 commentsViews: 8

30 डिसेंबर नवी मुंबईविनय म्हात्रे मुंबईवरच्या हल्ल्यानंतर पोलिसांवर सुरक्षेची जोखीम वाढली आहे. हल्ल्याला एक महिना उलटला तरी राज्यभर सतर्कतेचे आदेश असल्यामुळे पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत तर पोलीस कर्मचा-यांच्या सुट्या रद्द झाल्या. पण आता परिस्थिती निवळली आहे. त्यामुळे आता सरकारनं किमान साप्ताहिक सुटी सुरू करावी, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस कर्मचा-यांबरोबरच त्यांचं कुटुंबसुद्धा त्रस्त आहे. असं असलं तरी सुट्या मिळण्यासाठी कोणीही पोलीस कर्मचारी आपल्या वरिष्ठांकडे मागणी करीत नाही. अशी मागणी केली तर आपल्यावर कारवाई होईल, अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळे ते दबक्या आवाजात आपल्या समस्या एकमेकांसमोर मांडत आहेत. पण शहरात पोलीस कर्मचा-यांची संख्या कमी असल्यामुळे या सुट्टया रद्द केल्या, असं पोलीस अधिका-याचं म्हणणं आहे. मुंबई हल्ल्यानंतर थोड्याच काळात नागपूर अधिवेशन सुरू झालं. त्यामुळे सुट्या सुरू करण्याचा निर्णय लांबला आहे. पण येत्या 10 जानेवारीपासून या सुट्या नियमित सुरू होण्याची शक्यता आहे.

close