सलमान खानची दुष्काळग्रस्तांना मदत

May 9, 2013 4:31 PM0 commentsViews: 39

09 मे

अभिनेता सलमान खानच्या बिईंग ह्युमन फाऊंडेशनच्या वतीने मराठवड्यातल्या पाच दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील लोकांसाठी अडीच हजार पाण्याच्या टाक्यांची मदत दिली आहे. यातल्या 750 टाक्या बीड जिल्ह्यासाठी दिल्या गेल्यात. त्यापैकी 100 टाक्या बुधवारी बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या टाक्या उतरवण्यात आल्या आहेत. बीड तालुक्याला दीडशे टाक्या, गेवराई आणि आष्टीला प्रत्येकी 175 टाक्या तर पाटोदा आणि शिरूर तालुक्याला प्रत्येकी सव्वाशे टाक्या दिल्या जाणार आहेत. 6 मे ते 31 मे दरम्यान या पाण्याच्या टाक्या बिईंग ह्युमन फाऊंडेशनकडून पोहचवल्या जाणार आहे. या अगोदरही कलाक्षेत्रातील कलावंतांनी मदतची हात पुढे केला आहे. यामध्ये पार्श्वगायिका आशा भोसले, अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदत दिलीय.

close