मुंबई हल्ल्याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त

December 30, 2008 2:58 PM0 commentsViews: 2

30 डिसेंबर मुंबईमुंबई हल्ल्याची चौकशी करण्यासाठी दोन सद्स्याची समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यात प्रशासकीय अधिका-यांच्या हलगर्जीपणाचीही चौकशी होणार आहे.अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल राम प्रधान हे या समितीचं नेतृत्व करतील. व्ही. बालचंद्रन हे या समितीचे दुसरे सदस्य असतील.प्रधान यांना कॅबिनेट मंत्र्याचा तर बालचंद्रन यांना राज्यमंत्र्याचा दर्जा असेल. या समितीने मुंबई हल्ल्यासंबंधीचा अहवाल दोन महिन्यात सरकार सादर करावा अशी समितीकडून अपेक्षा आहे.

close