बंगळुरू बॉम्बस्फोट : पुण्यात 2 संशयित एटीएसच्या ताब्यात

December 31, 2008 4:11 AM0 commentsViews: 4

31 डिसेंबर, पुणेअद्वैत मेहताइंडियन मुजाहिद्दीनशी संबध असल्याच्या संशयावरून, पुणे एटीसएस ने दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. शब्बीर हुसेन नैरूद्दीन गंगाजली आणि नासीर शेख असं या संशयितांची नावं आहेत. बंगळूरू बॉम्बस्फोटातला आरोपी रियाज भटकळ आणि तौकिर अहमद यांचा शब्बीर जवळचा साथीदार, असल्याचं सांगण्यात येतंय.पुणे एटीएस ने मात्र याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. मंगळवारी उशीरा शब्बीरला ताब्यात घेण्यात आलं. पुण्यातील जनवाडी भागात एका प्रर्थना स्थळातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. पहिल्यापासूनच एटीएस त्याच्यावर नजर ठेऊन होते. शब्बीर मुळचाकर्नाटकचा आहे. पुण्यात तो त्याच्या बहिणीच्या घरी आला आहे, असा सुगावा एटीएसला लागला आणि एटीएसने त्याला ताब्याबत घेतलं. याचवेळी शब्बीरचा मेहुणा नासीर शेखलाही ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती शब्बीरच्या बहिणीने दिले. अद्याप शब्बीरला अटक केलेलं नाही, केवळ चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतल्याचं एटीएसनं स्पष्ट केलं आहे. चोकशीनंतर त्याला अटक हेऊ शकते. पुढील चौकशीसाठी त्याला बंगळुरू पोलिसांच्या ताब्यातही दिले जाऊ शकते.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र दोन्ही समुदायाच्या लोकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलल्याने कोणतेही अनुचित प्रकार घडले नाहीत.

close