महेंद्रसिंग धोणीला धमकीचं पत्र

December 31, 2008 5:12 AM0 commentsViews: 10

31 डिसेंबरभारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीसाठी या वर्षाचा शेवटचा दिवस धक्कादायक बातमी घेऊन आला. धोणीकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणारी दोन पत्रं आज सकाळी त्याच्या घरी आली. ही पत्रं मुंबईहून आली आहेत. डी गँगकडून ही पत्र आल्याचं बोललं जात आहे. धोणीच्या रांची इथल्या पत्त्यावर टपालाद्वारे हे पत्र आलं आहे. रांचीतल्या पोलीस अधीक्षकांकडे हे पत्र सुपूर्द करण्यात आलं. धोणीच्या कुटुंबियांनी घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनीही तातडीने अतिरिक्त पोलीस कमांडो घराबाहेर तैनात केले.

close