नववर्ष एक सेकंद उशिरा सुरू होणार

December 31, 2008 5:30 AM0 commentsViews: 3

31 डिसेंबर2009 च्या स्वागताला तुम्हांला एक सेकंद थांबावं लागणार आहे. कारण 31 डिसेंबरला रात्री 11 वाजून 59 मिनिटे आणि 60 सेकंद झाल्यावर आणखी एका सेकंदानंतर 1 जानेवारी 2009 चं आगमन होईल. नववर्ष एक सेकंद उशिरानं दाखल होण्याचं कारण आहे पृथ्वीची गती. आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ पृथ्वीच्या गतीवर अवलंबून आहे. पण सध्या पृथ्वीची गती साधारणत: 2 मिलीसेकंदानं कमी झाली आहे. यामुळे 500 दिवसांनंतर पृथ्वीची गती आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेत एका सेकंदाचा फरक पडतो. हे टाळण्यासाठी खबरदारी म्हणून प्रमाणवेळेत एक सेकंद आधीच वाढवण्यात येणार आहे. सेकंद वाढवण्याच्या या प्रकाराला लीप सेकंद असं म्हणतात. 1972 मध्ये पहिल्यांदा लीप सेकंदाची भर घालण्यात आली होती , तसच आधी 2005 मध्ये लीप सेकंदाची भर घातली गेली होती. गेल्या 34 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेत एकूण 23 लीप सेकंदांची भर घालण्यात आली आहे.

close