डॉ. कोटणीस स्मारकाचं काम रखडलं

December 31, 2008 5:50 AM0 commentsViews: 95

31 डिसेंबर, सोलापूरसिद्धार्थ गोदामडॉ. द्वारकानाथ कोटणीस हे आपल्या मानवतावादी विचारांमुळं जगात अजरामर झाले. त्यांच्या सन्मानार्थ चीनमध्ये अनेक स्मारकं उभी करण्यात आली. त्यांचं जन्मगाव असलेल्या सोलापुरातील आंतरराष्ट्रीय स्मारक मात्र गेल्या वीस वर्षांपासून रखडलंय.सोलापुरातील भैय्या चौकातील घरात डॉ. कोटणीस यांचा जन्म झाला. जपान-चीन युध्दाच्या वेळी त्यांनी केलेल्या चीनी जवानांच्या वैद्यकीय सेवेनं भारताच्या आदर्श मानवतावादी संस्कृतीची ओळख पुन्हा एकदा जगभर झाली. मात्र स्थानिक महानगर पालिकेच्या आळशी धोरणामुळं त्यांचं सोलापुरातील एकमेव स्मारक गेल्या वीस वर्षापासून रखडलंय. "महानगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे हे स्मारक रखडत आलंय. अधिका-यानी या प्रकरणी पाठपुरावा केला नाही." असं द्वारकादास कोटणीस स्मारक समितीचे अध्यक्ष रवीन्द्र मोकाशी यांनी सांगितलं.अधिकार्‍यांच्या मते ते त्यांचं काम करत आहेत. "स्मारकाच्या जागेचा प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात आला. पुढील एक-दीड वर्षात स्मारक चागल्या स्थितीत दिसेल" असं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त रणजीत सिंग देओल यांनी सांगितलं. मात्र केवळ मूळ घराच्या डागडूजीपलिकडं स्मारकाचं काम वीस वर्षात पोहचू शकलेल नाही.डॉ. कोटणीस याची जपान-चीन युध्दातील कामगीरी सुवर्णाक्षराने लिहावी अशीच आहे. त्या या कामाची दखल घेत चीन ने त्याच्या सन्मानार्थ अनेक स्मारके चीन मध्ये बाधली. सोलापुरातील त्याच्या जन्मस्थळी होणारे स्मारक गेल्या वीस वर्षापासून रखडले आहे.2010साली डॉ. कोटणीस यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याआधी तरी त्यांचं स्मारक उभारलं जाणार का, हाच प्रश्न आहे.

close