वन्य प्रण्यांसाठी दत्तक योजना

December 31, 2008 6:17 AM0 commentsViews: 4

31 डिसेंबर, मुंबईउदय जाधव वाघ, सिंह, बिबटे आणि हरीण यांच्यासारख्याच जंगलातल्या अनेक प्राण्यांचे आता तुम्ही पालक होऊ शकता .अशी संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये असलेले प्राणी, तुम्हाला आता दत्तक घेता येणार आहेत. ही योजना सुरू करण्यासाठी नॅशनल पार्कचे अधिकारी विचार करत आहेत.वाघ, सिंह, बिबटे आणि हरिण यांच्यासारख्याच जंगली प्राण्यांचं संगोपन चांगलं व्हावं, यासाठी मुंबईच्या नॅशनल पार्कचे अधिकारी एक दत्तक योजना बनवतायेत. ज्यामुळं सर्वसामान्यांना आता या जंगलातल्या प्राण्यांचं पालक बनता येणार आहे. "दत्तक घेतल्यानंतर प्राण्यांच्या देखभालीचा खर्च, औषधोपचाराचा खर्च प्राण्यांच्या पालकांनी शासनाकडे जमा करावेत, अशी ही योजना आहे" असं नॅशनल पार्कचे सहाय्यक वनसंरक्षक भारत राठोड यांनी सांगितलं. भारतात दुर्मीळ होत जाणार्‍या प्राण्यांबद्दल, लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी ही योजना नक्कीच काम करेल, असा विश्वास प्राणी मित्रांनाही वाटतोय. मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये चार सिंह आहेत. त्यांच्याबरोबरच आठ वाघ आणि बावीस बिबटेही आहेत. तसेच हरणंही खुप आहेत. यासर्वाचं तुम्हाला संगोपन करायचं असेल, तर आता तुम्ही त्यांचे पालक बनू शकता. त्यामुळे आता स्वत:ला शेर का बाप म्हणवणार्‍यांनी पुढे यायला हवं.भारतात वाघांची संख्या आता फक्त एकहजार चारशे अकरा एवढीच उरलीय. त्याच्या सारख्याच इतर प्राण्यांचं अस्तित्वही आता धोक्यात आलंय. म्हणूनच जंगलातल्या प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळं, त्यांचं भविष्य सुखरूप हातात असल्याचा विश्वास निर्माण होईल.

close