26/11 तील दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी

December 31, 2008 8:09 AM0 commentsViews: 1

31 डिसेंबर, मुंबईमुंबई अतिरेकी हल्ला प्रकरणी फहीम अन्सारीला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. त्याचा साथीदार सबाउद्दीन यालाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डी. बी. मार्ग पोलीस आणि सीएसटी हल्ल्याप्रकरणी, या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.या दोघांनाही उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडला गेलेल्या कसाबशी संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शिवाय मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर झालेल्या हल्ल्यात हात असण्याचा त्यांच्यावर संशय आहे. त्यांनी यासंदर्भात जे नकाशे तयार केले होते, जे फोटो काढले होते, त्याचा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात वापर केला गेला का ? याचा तपास चालू आहे. 26/11 च्या हल्ल्यातील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

close