औरंगाबादमध्ये लघुउद्योगांना मंदीचा फटका

December 31, 2008 9:25 AM0 commentsViews:

31 डिसेंबर, औरंगाबादसंजय वरकडजागतिक मंदीच्या तडाख्यामुळं औरंगाबादेतील वळुंज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील अनेक लघुउद्योग बंद पडले आहेत. वाळूज वसाहतीतील काही मोठ्या कंपन्यांनी 45 दिवसांच्या ले-ऑफची नोटीस दिली आहे. त्यामुळं छोट्या आणि मोठ्या कंपन्यांतील सुमारे सात हजार कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे.जे एन मॉरिसन या कंपनीतील या महिला कामगार आपल्या चिल्ल्यापिल्यांची फरफट होत असतानाही चक्री उपोषण करत आहेत. अचानक कंपनी बंद पडल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांनी जागतिक मंदीमुळ उत्पादन थांबवलंय. वाळूंज औद्योगिक वसाहतीतील इंड्युरन्स आणि व्हेराकच्या प्रत्येकी एका प्लॅन्टने पंचेचाळीस दिवस लेऑफची नोटीस दिली आहे. या दोन कंपन्यांतील कामगारांची संख्या सहाशेच्यावर आहे. बंद पडलेल्या छोट्या कंपन्यापैकी व्हेनस इंजिनिअरिंग, उमा प्रसिएशन, वर्षा फोर्जिंग, मायो ऑटोमॅटिक, यशश्री प्रेस कोलोनट, यशवंत इंडस्ट्रीज, ओम इंजिनिअरिंग, संग्राम ऑटो या कंपन्यांनी उत्पादन थांबवल्याचं लेखी पत्र जिल्हा प्रशासनाला दिलंय. याशिवाय अनेक कंपन्यांनी माहिती न कळवताच उत्पादन थांबवलं आहे.मराठवाड्यात आजारी उद्योगांचा प्रश्न गंभीर बनलेला असताना आता जागतिक मंदीमुळं अनेक उद्योग बंद पडताहेत. त्यामुळं हजारो कामगार बेकार होताहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढं येत नाही. त्यामुळे हा प्रश्न कसा सुटणार ? हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतोय.

close