वर्ध्यात कालव्यांची दुरावस्था

December 31, 2008 9:27 AM0 commentsViews: 1

31 डिसेंबर, वर्धासरकारने शेतकर्‍यांची पाणी वाटप समिती स्थापन केली आहे. शेतीसाठी पाण्याचे योग्य वाटप व्हावं याकडे लक्ष पुरवण्याचं काम ही समिती करते. पण वर्ध्यामध्ये कालव्यांच्या साफसफाईअभावी शेतीला पाणीच मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा बोजवारा उडालाय. वर्ध्यात चार मध्यम आणि वीस लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. बहुतांश शेतकरी कालव्याच्या पाण्याचा वापर करून पीक घेत आहेत. पण,अनेक वर्षापासून कालवे बुजले असून गेट बंद आहेत. जिल्हयात पाटबंधारे विभागाने जवळपास चाऴीस पाणी वापर संस्था स्थापन केल्या आहेत. पण या संस्थापुढे निधीची अङचण आहे. त्यामुळे कालव्यांच्या दुरुस्तीचा मोठाच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालाय.

close