कोल्हापूरमध्ये इन्कम टॅक्स अधिकार्‍याला लाच घेतना पकडले

December 31, 2008 9:29 AM0 commentsViews: 1

31 डिसेंबर, काल्हापूरकोल्हापूरमध्ये इन्कम टॅक्स अधिकार्‍याला लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडलं. नीलिमा जवाहर आळतेकर असं या इन्कम टॅक्स अधिकार्‍याचं नाव आहे. त्या अजरा तालुक्यातील पोळगावच्या शशिकांत नार्वेकर यांची फाईल बंद करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेत होत्या. त्यावेळी अ‍ॅन्टी करप्शननं ही कारवाई केली. सुरवातीला आळतेकर यांनी फिर्यादी शशिकांत यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर सहा हजारावर हे प्रकरण मिटवू असं नार्वेकर यांना सांगितलं होतं.

close