जळगावच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या खुनाचा तपास थंडावला

December 31, 2008 9:33 AM0 commentsViews: 6

31 डिसेंबर, जळगावप्रशांत बाग जळगाव काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी.पाटील यांच्या हत्या होऊन तीनपेक्षाही जास्त वर्षाचा काळ उलटला. या हत्येच्या तपासासाठी सीबीआयच्या जळगावमध्ये फेर्‍या सुरू आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळं तपासात ढिलाई होत असल्याचा आरोप व्ही. जी. पाटील यांच्या पत्नीनं केला आहे. याआधी एलसीबी आणि सीआयडीकडे हा तपास होता. त्यांच्याकडून तपासाची सूत्र सीबीआयकडे सोपवण्यात आली आहेत.मानराज पार्क जवळ प्रा. व्ही. जी. पाटील यांची एकवीस सप्टेंबर दोन हजार पाचला हत्या झाली. पण या हत्येचा तपास अजून झाला नाही. "माझ्या पतीचा खून उल्हास पाटील जी.एन.पाटील यांनी केलाय. ज्यावेळेला मला समजलं माझे पती या जगात नाहीत, त्यावेळेला मी सिव्हिलमधेच पोलिसांना सांगत होती की उल्हास पाटील जी.एन.पाटील यांनीच माझ्या पतीचा खून केलाय" असं व्ही. जी. पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील यांनी सांगितलं.पण अनेक वर्ष पोलीस स्टेशनच्या फेर्‍या मारूनही रजनी पाटील यांना न्याय मिळालेला नाही. "काय करायचं मी 3 वर्षांपासून चकरा मारुन मारुन थकून गेली मी माझा महिन्याचा अर्धा पगार मी केससाठी वाया घालवते काय न्यायासाठी कसं लढायचं" असं रजनी पाटील म्हणाल्या.हत्येनंतर आठच दिवसांत पोलिसांनी दोन मारेक-यांना ताब्यांत घेतलं. यातील एक आरोपी राजू माळीचा एक वर्षापूर्वी जेलमध्येच मृत्यु झालाय. तर दुसरा आरोपी राजू सोनावणे जेलमध्ये आहे. कलम एकशे चौसष्ट नुसार सोनवणे यानं या न्यायालयात जबाब देण्याची परवानगी मागीतली होती. पण सीबीआयनं उच्च न्यायालयाचा हवाला देउन त्याचा जबाब थांबवलाय. एक प्रमुख आरोपी राजू माळी दगावल्यानं हि केस खिळखिळी झाल्याची चर्चा आहे. तरी खालच्या कोर्टानं स्क्वॅश केलेल्या दामू लोखंडे आणि लिलाधर नारखेडे यांना मुंबई उच्चन्यायालयाच्या आदेशानं पुन्हा आरोपी बनविण्यांत आलंय हाच काय तो या केसच्या तपासातील एकमात्र आशेचा किरण. काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडणूक वादातूनच व्ही जी पाटील यांची हत्या झाल्याचा आरोपावर रजनी पाटील ठाम आहेत. सीबीआयचं पथक तपासासाठी लवकरच जळगावला पुन्हा येतंय. पण राजकीय दबावानं न्याय मिळेल का हा प्रश्न पाटील यांना सतावतोय.

close