नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज

December 31, 2008 8:25 AM0 commentsViews: 3

31 डिसेंबर, कलांगुटदिनेश केळुस्कर मुंबईवरचा 26 /11 चा हल्ला पाहता गोव्यात नववर्षाच्या पार्टीज यंदा कमी होतील, असं वाटत होतं. पण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात गर्दी वाढली आहे. मोठ्याप्रमाणावर पर्यटक गोव्यात येत आहेत. या पर्यटकांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झालं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. समुद्रपर्यटनासाठी बोटी सजवल्या गेल्या आहेत. हॉटेल आणि रेस्तॉरंटही पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार आहेत. गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणार्‍यांमध्ये सामान्य लोकांपासून, सेलिब्रेटीज, राजकारण्यांचाही समावेश असतो. यावर्षी या उत्सहावर मुुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. तरीही येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येताहेत. गोव्याचा कलंगुट बीचवरचं वातावरण पाहण्यासारखं आहे. कलांगुट बीच पर्यटकांनी फुलून गेला आहे. बीचवर पर्यटकांच्या बोटींग आणि पॅरासॉलिंग या अ‍ॅक्टीव्हीटी सुरू झाल्या आहेत. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्यत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. हे पाहता गोव्यात पर्यटकांची संख्या रोडावेल असं बोललं जात होतं. पण गोव्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटक सांगतात, " गोव्यातली हॉटेल्स खूप फुल्ल आहेत, याची आम्हाला कल्पना असूनही आम्ही गोव्यात सेलिब्रेशनसाठी आलो आहोत. कारण नववर्षं एकदाच येतं. शेवटी रंगाचा बेरंग करू नये हे आपल्याच हातात आहे."

close