सांगलीतल्या विजय फराटेंच्या कंठ सनईचा विश्वविक्रम

December 31, 2008 10:31 AM0 commentsViews: 24

31 डिसेंबर, सांगली आसीफ मुर्सल सनईचं नाव घेतल्यावर आपल्याला शहनाई वादक उस्ताद बिसमिल्ला खाँ यांचं नाव डोळ्यांसमोर येतं. शहनाई वादक उस्ताद बिसमिल्ला खाँ यांना आदर्श मानणा-या सांगलीच्या विजय फराटेंचा कंठ सनईच्या सुरावटींमुळे लिमका बुकमध्ये विक्रम नोंदवला आहे. सलग 3 तास आपल्या कंठाने सनई वाजवणा-या विजय फराटेंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विजय फराटेंना संगीताचा वारसा लाभलाय त्यांचे आजोबा भजन सम्राट , तर वडील ख्यातनाम गायक होते . त्यांचे वडीलच त्यांचे गुरू. विजय फराटे यांनाही संगीताची आवड होती. त्यातूनच ही कला त्यांना प्राप्त झाली आहे. विजय फराटे सांगतात, " गेल्या तीन पिढ्या आमच्या घराण्यात गाणं, नाटक आणि भजन आहे. माझे वडील काशिनाथ फराटे-डीग्रजकर यांनी सुरेश वाडकर सारख्या कलाकाराला घडवलं आहे. विजय फराटेंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हातात सनई नसतानाही सनईचे सूर त्यांच्या कंठातून उमटतात. सांगलीच्या मौजे डिग्रज मधली विजस फराटेंची सनई आता जागतिक स्तरावर जाऊन पोहचली आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात सनई वादनाला विशेष महत्त्व आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनई वादनाने भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपलं नाव केलं होतं. त्याचप्रमाणे आता विजय फराटेही रसिकांना मंत्रमुग्ध करत आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी मेहनत घेउन ही कला जोपासली आहे. विजय फराटे सांगतात, " शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना मी माझा आदर्श मानतो. पण त्यांची नक्कल मराण्याचा प्रयत्न मी कधीच केलेला नाहीये. मी कंठ सनईचे प्रयोग माझ्याचपत्रद्धतीनं करत आहे. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपलीही कला सादर केली आहे. पण या कलाकाराला हवी ती प्रतिष्ठा अजून तरी मिळाली नाहीये.

close