4 शहरात एनएसजी हब स्थापन करणार- गृहमंत्री

December 31, 2008 11:10 AM0 commentsViews: 2

31 डिसेंबर दिल्लीगृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी पत्रकार परिषद घेतली. ह्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी 4 शहरात नवीन एनएसजी हब स्थापन करणार असल्याचं सांगितलं. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतंर्गत सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याकरिता अंतर्गत सुरक्षा सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी 20 नवीन विशेष अतिरेकी विराधी पथकं उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेसाठी 94.15 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येणार आहे . भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान याआधी झालेल्या करारानुसार 66 पाकिस्तानी कैद्यांची सुटका केली जाणार आहे. तसंच देशाच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी जानेवारीमध्ये सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती या पत्रकार परिषदेत गृहमंत्र्यांनी दिली.

close