26/11चा मास्टरमाईंड झरार शाहला पाकिस्तानात अटक

December 31, 2008 12:49 PM0 commentsViews: 1

31डिसेंबर 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झरार शाह याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढत चाललाय. त्यामुळे पाकिस्ताननं ही कारवाई केल्याचं बोललं जातंय. पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झरार शाह आणि झकीर रहमान लख्वी यांना पाकव्याप्त काश्मीरमधून याआधीच पकडण्यात आलं आहे. अमेरिकन माध्यमाच्या आधार घेऊन असं बोललं जातंय की झरार शाहने मुंबई हल्ल्यातील तो मास्टर माईंड होता. तसेच लष्कर-ए-तोएबाच्या अन्य नेत्यांचाही मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याची माहिती झरारने दिली आहे.

close