जीव मिल्खा सिंगचा चंदीगडला सत्कार

December 31, 2008 9:54 AM0 commentsViews: 3

31 डिसेंबरभारताचा आघाडीचा गोल्फपटू जीव मिल्खा सिंगचा त्याच्या गावी चंदीगडला सत्कार करण्यात आला. चंदीगड गोल्फ असोसिएसनने हा सोहळा आयोजित केला होता. जीवची पत्नी कुदरत आणि त्याचे वडील धावपटू मिल्खासिंग या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुढच्या वर्षी आपण निवडक स्पर्धात भाग घेऊन महत्त्वाच्या स्पर्धांवरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचं जीव मिल्खा सिंगने यावेळी बोलताना सांगितलं. त्यामुळे पुढच्या वर्षी तो नेहमीच्या 37 स्पर्धांऐवजी 32 गेल्फ स्पर्धात भाग घेणार आहे. त्याच बरोबर भारतात आणखी काही गोल्फ कोर्ट उभारण्याची इच्छाही त्याने यावेळी बोलून दाखवली.

close