‘कॅग’ने आजी-माजी मंत्र्यावर ताशेरे ओढले

December 31, 2008 2:11 PM0 commentsViews: 5

31 डिसेंबर मुंबईमहसूलमंत्री पतंगराव कदम आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शिक्षण संस्थांना स्वस्तात जमीन दिल्याबद्दल 'कॅग'ने राज्यसरकारवर ताशेरे ओढलेत. 'कॅग'चा अहवाल मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला. त्यात या आजी-माजी मंत्र्यावर सरकारने केलेल्या मेहेरबानीचा उल्लेख आहे. भारती विद्यापीठाच्या दंत महाविद्यालयाला नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर इथं 2 हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला. तोही अर्ध्या किंमतीत. यामुळं सरकारला 1 कोटी 63 लाखांचा तोटा झाल्याचं अहवालात म्हटलंय. तर दुसरीकडं लातूर औद्यागिक वसाहतीत विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या कॉलेजसाठीही सरकारनं निम्म्या किंमतीत एक भूखंड दिला. त्यात या देशमुख फाऊंडेशनला 1 कोटी 19 लाखांचा फायदा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय.

close