हसन अली पोलिसांच्या जाळ्यात

December 31, 2008 11:06 AM0 commentsViews: 1

31 डिसेंबर पुणे36 हजार कोटींच्या मालमत्तेवरील कर बुडवणारा पुण्यातला बिझनेस टायकून हसन अली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अनधिकृत हवाला व्यवहार ते घोड्यांचा व्यापार, बनावट पासपोर्टस आणि करोडो रुपयांची टॅक्सचोरी त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्याला मालमत्तेच्या तिप्पट कर भरावा लागेल. म्हणजे जवळपास हा कर 1 लाख कोटींपेक्षाही जास्त असेल. बनावट पासपोर्ट प्रकरणात अडकलेल्या हसन अलीने स्वीस बँकेतल्या खात्यांमार्फतही अनेक गैरव्यवहार केले आहेत. अनधिकृत हवाला व्यवहार ते घोड्यांचा व्यापार, आणि बनावट पासपोर्टस् ते करोडो रुपयांची टॅक्सचोरीअशी ओळख असलेला पुण्यातला बिझनेस टायकून हसन अली कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. इन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हसन अलीनं 36 हजार कोटींची अवैध मालमत्ता जमवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. याच मालमत्तेवरचा कर बुडवल्याबद्दल इन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं ही नोटीस बजावली आहे.

close