नववर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत

December 31, 2008 7:03 PM0 commentsViews: 2

1 जानेवारी 2009नव वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाभारतात नव्या वर्षाचं स्वागत उत्साहात करण्यात आलं. असं असलं तरी मुंबईत मात्र दरवर्षी दिसणारा जोश मात्र दिसत नव्हता.मुंबई हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता गेट वे ऑफ इंडियावर गर्दी फारशी नव्हती. गोव्यामध्येही बीच पार्टीला बंदी घातल्यामुळे गोवेकरांनी नव वर्षाचं स्वागत पारंपरिक पद्धतीनं केलं.औरंगाबादमध्ये शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं. नवीन वर्षाचं स्वागत करताना सांगली पोलिसांनी 'दारू नको दूध प्या' असा संदेश दिला आहे. आपल्या कृतीमधून व्यसन मुक्तीचा एक नवा धडाच त्यांनी लोकांसमोर ठेवलाय. सर्वात प्रथम नव्या वर्षाचं स्वागत सिडनी आणि ऑकलंडमध्ये करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागत या देशांनी फटाक्यांच्या आतषबाजीत केलं. एकामागोमाग एक फटाके वाजत होते.आणि आकाशात जणू लाख दिव्यांची रोषणाई झाल्याचा भास होत होता.

close