नवी मुंबईला 1700 कोटींची नववर्ष भेट

January 1, 2009 5:24 AM0 commentsViews: 5

1 जानेवारी, नवी मुंबईविनय म्हात्रे मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई उभारण्यात आली आहे. या नवी मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी 1700 कोटींचे प्रोजेक्टस् नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणार आहेत. या प्रोजेक्टस्‌ना 850 कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकार देणार आहेत. नवी मुंबई महानगर पालिकेतर्फे राबवण्यात येणारे प्रॉजेक्टस् हे नववर्षांची भेट ठरले आहेत. नवी मुंबई झपाट्यानं वाढलेलं शहर आहे. पण वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे शहरावरील ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी रस्ते, नाले, गटारे, पाणी आणि डंपिंग ग्राऊंडचे प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठीसाठी 430 कोटी रुपयांचा, तर पावसाळी नाल्यांसाठी 437 कोटी रुपयंाचा खर्च केला जाणारेय. शहरातील महत्त्वाच्या पामबीच मार्गावर 459 कोटी खर्च होणार आहेत तर अंतर्गत जलवाहिन्यांसाठी 232 कोटी खर्च येणार आहे. तर डम्पिंग ग्राऊंड आणि संगणकीकरणासाठी 102 कोटी रुपये खर्च होणारेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व प्रोजेक्ट 3 वर्षांत पूर्ण केले जाणार आहेत. " नवी मुंबईचा कायापालट करण्यासाठी जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यांच्यासाठी वेगळी टीम तयार केली आहे. या प्रकल्पांतर्गत होणा-या कामांचस दर्जा राखण्यासाठी आणि कामं पूर्ण होण्यासाठी, स्पेशल इंजिनियर नेमण्यात आले आहेत, "अशी माहिती स्थायी समितीचे चेअरमन संदीप नाईक यांनी दिली.केंद्र सरकारच्या मदतीमुळे नवी मुंबईतल्या कामांवर खर्च केली जाणारी पालिकेच्या बजेटमधील बरीच रक्कम उरणार असण्याचीही शक्यता आहे. ही उरलेली रक्कम शहरी ग्रामीण आणि झोपडपट्टीवर खर्च केली जाणार आहे. गेल्या 10 वर्षांत नवीमुंबईचा झपाट्यानं विकास झाला आहे.येत्या 10 ते 15 वर्षांत इथली लोकसंख्या वाढणार आहे. ते पाहता इन्फास्ट्रक्चरवर ताण पडू नये यासाठी पालिकेनं हे 5 प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. या प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकार मदत करणार आहे. या मेगा प्रोजेक्ट बरोबरच शहरात मोनो रेल, स्काय वॉक, अ‍ॅम्युजमेंट पार्क, सायन्स सेंटर अशा 23 प्रोजेक्टसचीही कामं हाती घेण्यात आली आहेत. " 20 वर्षांचं काम 3 वर्षांत पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे 2031 पर्यंतचा नवी मुंबईवरचा ताण कमी होणार आहे," असा विश्वास नवीमुंबई महानगर पालिकेचे सिटी इंजिनिअर मोहन डगांवकर यांनी दिलाये. हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर खर्‍या अर्थाने नवी मुंबईला 21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखलं जाईल.

close