राजदीप सरदेसाई देशातल्या 50 प्रभावशाली व्यक्तींमध्ये

January 1, 2009 5:56 AM0 commentsViews: 4

1 जानेवारी, मुंबई सीएनएन-आयबीएनचे एडिटर-इन-चीफ राजदीप सरदेसाई आणि नेटवर्क 18 चे व्यवस्थापकीय संचालक राघव बेहल यांना देशातल्या 50 प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळालं आहे. डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रानं देशातल्या 50 प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. सिटीझन जर्नलिस्ट ही नवी संकल्पना सुरू करून राजदीप सरदेसाई यांनी चोवीस तास न्यूज चॅनेल अधिक लोकाभिमुख केलं, असं डीएने नं म्हटलं आहे. पत्रकारिता आणि त्यांच्या इतर कार्यांची यात दखल घेण्यात आली आहे. राजदीप यांच्याबरोबरच रतन टाटा, मनमोहन सिंग, सोनिया गांधी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, आमीर खान आणि शरद पवार यासारख्या व्यक्तींचा टॉप फिफ्टीज्‌मध्ये समावेश आहे.

close