आरपीआयनं जाळलं सातारचं वीज वितरण कंपनीचं कार्यालय

January 1, 2009 5:49 AM0 commentsViews: 2

1 जानेवारी, सातारातुषार तपासे सातारा जिल्ह्यातलं महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचं वाठार स्टेशन इथलं कार्यालय जाळलं आहे. वीजवितरण कंपनीचं कार्यालय जळल्या प्रकरणी 6 आरपीआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. लोडशेडींग विरोधाच्या संदर्भात रिप्ब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकत्यांनी वाठार स्टेशनमध्ये जाळपोळ केली. या जाळपोळीत कार्यालयाचं मोठ्याप्रमणावर नुकसान झालं आहे. महत्त्वाचे कागदपत्र जळून खाग झालेत. सकाळी 8. 30 वाजत वीजवितरण कंपनीच्या वाठार स्टेशन कार्यालयावर 150 ते 200 जणांचा मोर्चा गेला होता. या जमावामध्ये काही आरपीआयचे कार्यकर्ते होते तर काही सातरचे स्थानिक ग्रामस्थ होते. या जमावातल्या लोकांनी वठार स्टेशन कर्यालयात घुसून कार्यालायची मोडतोड केली. महत्त्वाचे पेपर फेकून दिलेत. कार्यालायवार दगडफेकही केली. ग्रामीण भागात 12 – 12 तासांचं लोडशेडिंग होत आहे. लोडशेडिंगची वेळही वाढत आहे. ग्रामीण भागात अनियमिवेळी होणा-या भारनियमनाचा निषेध म्हणून कार्यालय जाळल्यांचं म्हटलं आहे. आगीत अनेक जुने रेकॉर्डस्, कम्प्युटर्स जळले आहेत. वाठार स्टेशनचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. याबाबत आरपीआयचे कार्यकर्ते अमोल आवळे सांगतात, " सतारा जिल्ह्यातून सर्वात जास्त वीज निर्मिती होते. तरीही भार नियमनाची झळ पुणे, बारामती या दोन जिल्ह्यांना न बसता साता-याला का बसते, हेच कळत नाही. साता-यातल्यर 12 ते 13 तासांच्या भारनियमनाला स्थानिक शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी वर्ग कंटाळलेला आहे. सातारच्या भारनियमनामुळे तिथल्या विद्यार्थ्यांच्या एका पिढीचं कमालीचं नुकसान होत आहे. अनेकवेळा अधिका-यांच्या लक्षात आणून दिलं आहे, निदर्शनं केली आहेत, भारनियमनाविरोधी आंदोलनं केली पण सरकारी अधिका-यांच्या वर्तणुकीत काहीच सुधारणा झालेली नाहीये. त्यामुळे आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला आहे." " आंदोलकांच्या संतापाचा उद्रेक होणार आहे, याची माहिती सातरच्या पोलिसांना होती. काल संध्याकाळी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या वाठार स्टेशनचे अधिकारी आणि कायकर्ते यांची एक बैठक पोलीस घेणार होते. काही कारणांमुळे ती झाली नाही. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतल्यानं त्यांच्यातल्या 6 जणांना आम्ही पकडलं आहे, " अशी माहिती साता-याचे डीवायएसपी दिगंबर प्रधान यांनी दिली आहे.

close