नाशिकच्या बाजारात कांद्याची आवक वाढली

January 1, 2009 8:07 AM0 commentsViews: 5

1 जानेवारी 2009 मनमाडबब्बू शेख नाशिकच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवाक झाली आहे. कांद्याचा भाव वाढल्यानं शेतक-यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 1400ते 1600 प्रती क्विंटल दरानं कांद्याची विक्री झाली. एकट्या लासलगाव बाजार समितीत एका दिवसात 60,000क्विंटल कांद्याचीआवक झाली. त्यापैकी 30,000क्विंटल कांद्याचे लिलाव झाले. तरीही कांद्याला मोठी मागणी असल्यानं कांद्याचे भाव वरचढ आहेत. शेतकरी सांगतात, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली परिस्थिती आहे. विदेशी कंपन्यांमध्येही कांद्याची मागणी वाढली आहे.मोठी आवक आणि समाधानकारक भाव असा अनुभव क्वचितच येतो. त्यामुळे ट्रक, टॅक्टर आणि बैलगाड्या भरून कांदा घेवून येणारे शेतकरी खूश आहेत.

close