जागेच्या वादात अडकलंय रानडे इन्स्टिट्यूट

January 1, 2009 9:26 AM0 commentsViews: 4

1 जानेवारी 2009 पुणेप्राची कुलकर्णीजागेच्या मालकीच्या वादात अडकलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमधले वृतपत्रविद्या आणि विदेशी भाषा हे विभाग विद्यापीठातल्या नव्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणार आहेत. रानडे इन्स्टिट्यूटची ही जागा पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर आहे. ही जागा शिरोळे याच्या मालकीची आहे.1907 साली ही जागा शिरोळेंनी सर्व्हन्ट्स सोसायटीला 99 वर्षांच्या लीज वर दिली. सर्व्हन्ट्स सोसायटीनी ही जागा पुणे विद्यापीठाला सबलीजवर दिली. आता या लीजची मुदत संपल्यामुळे शिरोळे यांनी या जागेचा ताबा मागितला आहे. या वादामुळे विद्यापीठाला इथले दोन्ही विभाग शिफ्ट करावे लागणार आहेत. कॅम्पसमध्ये हे विभाग शिफ्ट झाल्यामुळे मुलांचा फायदा होणार आहे असं विद्यापीठाचं म्हणणं आहे.विद्यापीठानं लीज संपल्याचं कारण दिलं असलं तरी शिरोळेंचं म्हणणं वेगळं आहे. शिरोळे सांगतात, आम्ही जागेबाबत विद्यापीठाशी संपर्क असता त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही.ही जागा हेरीटेज स्ट्रक्चर असल्यानं इथं नव्यानी बांधकाम करता येणार नाही.पण यामुळे नुकसान होणार आहे ते मात्र विद्यार्थ्यांचं. इथं शिक्षण घेण्याबरोबरच अनेक विद्यार्थी इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत युपीएससी, राज्यसेवा या परीक्षांचा अभ्यासही करत असतात. त्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे.अनेक नामवंत पत्रकार आणि तत्त्वज्ञ घडवणारी पुण्यातली रानडे इन्स्टिट्यूट आता शेवटची घटका मोजत आहे.

close