मुंबई वगळता डॉक्टरांचा संप मिटला

April 26, 2013 9:28 AM0 commentsViews: 17

26 एप्रिल

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये उभी फूट पडलीय. आता फक्त मुंबईतील मार्डचे डॉक्टर संपावर आहेत. उर्वरित सर्व 14 वैद्यकीय महाविद्यालयातील मार्डच्या डॉक्टरांनी मात्र संपातून माघार घेतली आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलसह राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटलमधील डॉक्टर आज संध्याकाळपासून कामावर हजर होणार आहेत. तब्बल 2800 डॉक्टरांनी संप मागे घेतल्यामुळे मार्डच्या संपामध्ये थेट फूट पडलीय. संपाच्या तिसर्‍या दिवशी पुण्यातील डॉक्टरांनी काल संप मागे घेतला होता. आज चौथ्या दिवशी तर संपात लक्षणीय फूट पडलीय. विशेष म्हणजे मार्डचे अध्यक्ष डॉ. संतोष वाकचौरे यांनी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आम्ही संप मागे घेण्यास तयार आहोत अशी घोषणा गुरूवारी केली होती. आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत. आम्हाला कोर्टाचा पूर्ण आदर आहे. कोर्टाचा अवमान करण्याचा आमच्या कोणताही इरादा नाही. म्हणून आम्ही संप मागे घेण्यास तयार असून माझा निर्णय हा मार्ड संघटनेला मान्य आहे अशा शब्दात वाकचौरे यांनी मार्डचा संप मिटल्याचे संकेत दिले होते. मात्र पुण्यापाठोपाठ राज्यातील डॉक्टरांनाही माघार घेतली असून मुंबईतच संप सुरू आहे.

close