‘कोलगेट’अहवाल सरकारला दाखवला, प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर

April 26, 2013 9:55 AM0 commentsViews: 9

26 एप्रिल

नवी दिल्ली : कोळसा खाण वाटप प्रकरणी सीबीआयचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. या प्रतिज्ञापत्रात सीबीआयने चौकशी अहवाल कायदामंत्र्यांना दाखवल्याचं मान्य केलंय. तसंच पंतप्रधानांचं कार्यालय आणि कोळसा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना दाखवल्याचंही या अहवालाता नमूद करण्यात आलंय. आता नवीन अहवाल सादर केला जाईल हा अहवाल राजकीय नेतृत्वाला दाखवणार नाही असं सीबीआयनं स्पष्ट केलंय. सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकारने या अहवालात केलेल्या बदलांचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही अशी टीका वकील प्रशांत भूषण यांनी केली. तसंच बैठकांना आणखी कोण उपस्थित होते याचा उल्लेख नाही याकडंही भूषण यांनी लक्ष वेधलंय. कायदामंत्री अश्वनीकुमार सीबीआय तपासात हस्तक्षेप करत असल्याचा विरोधकांनी आधीपासूनच आरोप केला होता. दरम्यान, सीबीआयनं प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर केंद्रीय कायदामंत्री अश्वनीकुमार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. तसंच त्यानंतर काँग्रेस कोअर कमिटीचीही बैठक बोलावण्यात आली.

close