सीबीआयच्या अहवालाचे संसदेत उमटले पडसाद

April 26, 2013 10:25 AM0 commentsViews: 4

26 एप्रिल

कोळसा खाण वाटप प्रकरणी सीबीआयने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. या प्रतिज्ञापत्रात सीबीआयने चौकशी अहवाल कायदामंत्र्यांना दाखवल्याचं मान्य केलंय. तसंच पंतप्रधानांचं कार्यालय आणि कोळसा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना दाखवल्याचंही या अहवालाता नमूद करण्यात आलंय आता या अहवालाचे पडसाद संसदेतही उमटले. विरोधकांनी गेल्या चार दिवसांच्या सरकारविरोधी भूमिकेला अधिकच धार चढली. दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ होऊन लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी यूपीएच्या घटकपक्षांशी चर्चा केली.

यूपीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत काय घडलं ?

- सीबीआयच्या प्रतिज्ञापत्राची सखोल चर्चा- आता अश्वनीकुमार यांना राजीनामा द्यावा लागल्यास पंतप्रधानांना लक्ष्य केलं जाईल असा घटक पक्षांचा आक्षेप- सोनिया गांधींचा अश्वनीकुमार यांना पाठिंबा, विरोधकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका- 'कोर्टात दाखल करण्यात आलेला हा स्टेटस रिपोर्ट कोणत्याही राजकीय नेतृत्वाला दाखवण्यात आलेला नाही', या प्रतिज्ञपत्रातील विधानाचा आधार – 30 एप्रिलला सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय- शरद पवार, अजित सिंह हे घटक पक्षाचे नेते पंतप्रधानांच्या पाठीशी

close