2009 साल खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओला समर्पित

January 1, 2009 7:40 AM0 commentsViews: 104

1 जानेवारी, पुणे प्राची कुलकर्णी 2009 हे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. गॅलिलिओ गॅलिली या शास्त्रज्ञाने 400 वर्षांपूर्वी दुर्बिणीतून आकाश पाहिलं. त्याची आठवण म्हणून हे वर्ष साजरा करण्यात येतं आहे. सूर्य हा केंद्र असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत गॅलिलीओनं मांडून प्रचंड मांडून खळबळ उडवून दिली होती. याच गॅलिलिओनं 400 वर्षांपूर्वी दुर्बीण आकाशाकडे वळवली. त्याची आठवण म्हणून हे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्ष म्हणून साजर केलं जात आहे. त्या निमित्तानं विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी पुण्यात अनेक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी खास हौशी खगोलशास्त्रज्ञांच्या संस्थांनी एकत्र येऊन पुणे फोरमची स्थापना केली आहे. " 400 वर्षांपूर्वी खगोल शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी नुकत्याच लावलेल्या दुर्बिणीच्या शोधाचा उपयोग करून खगोल शास्त्रामाध्ये उपकरणं वापरण्याच्या प्रथेला सुरुवात केली. सूर्य हा केंद्र असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत गॅलिलीओनं लावून विज्ञानाला कलाटणी दिली. त्याची आठवण म्हणून आपण हे खगोल – विज्ञान वर्षं म्हणून साजरं करत आहोत , " अशी माहिती आयुका विज्ञान प्रसार अधिकारी अरविंद परांजपे यांनी दिली आहे. या वर्षात आकाश निरिक्षणापासून ते दुबिर्णी बनवण्याच्या प्रशिक्षणापर्यंत अनेक कार्यक्रम पुण्यातल्या आयुकाच्या मदतीने साजरे केले जातील. 1 जानेवारीला जयंत नारळीकरांच्या गॅलीलीओ वरच्या लेक्चरनी या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. " खगोलशास्त्र वर्षानिमित्त यंदा आम्ही निरनिराळ्या उपक्रमांचं कार्यक्रमांचं आयोजन करणार आहोत. विविध कार्यशाळा असणार आहेत. दुर्बीण बनवण्याची कार्यशाळा ही लक्ष्यवेधी असणार आहे. या दुर्बीण बनवण्याच्या कार्यशाळेत आम्ही विद्यार्थ्यांबरोबरीनं स्थानिक लोकांना सहभागी करून घेणार आहोत. हे लोकं पुढे स्वबळावर दुर्बीण बनवण्याच्या कार्यशाळा घेतील आणि खगोल शास्त्राचा प्रसार गावांगावतून करतील, " अशी माहिती अरविंद परांजपे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र वर्षानिमित्त दुर्बिणी बनवण्याच्या सुमारे आठ कार्यशाळा होणार आहेत. खगोलशास्त्रात करिअर करण्यासाठी शास्त्रज्ञ मुलांना भेटून माहिती देणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आयुका विशेष प्रयत्न करणार आहे.

close