सरकारची याचिका फेटाळली, ‘जायकवाडी’ला पाणी सोडाच’

April 26, 2013 1:21 PM0 commentsViews: 39

26 एप्रिल

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी येण्याचा मार्ग मोकळा झालाय. नाशिक आणि नगरमधून जायकवाडी धरणात पाणी सोडावं, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले होते. पण, त्याला नाशिक आणि नगरकरांचा विरोध आहे. त्यामुळे कोर्टाने आपल्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी याचिका राज्य सरकारने आज दाखल केली होती. पण, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असलेल्या मराठवाड्याला दिलासा मिळाला.

close