LBT विरोधात व्यापार्‍यांचा निषेध मोर्चा

April 26, 2013 1:40 PM0 commentsViews: 48

26 एप्रिल

राज्यभरात लागू करण्यात आलेला स्थानिक स्वराज्य संस्था कर (LBT)रद्द करण्यात यावा यासाठी व्यापार्‍यांनी आज आझाद मैदानात निषेध मोर्चा काढला. एलबीटी रद्द करावा अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. एलबीटीमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढेल अशी व्यापार्‍यांची समजूत आहे. दर महिन्याला हिशोब सादर करणे, प्रत्येक वस्तू विकल्यानंतर त्याच्या नोंदी करणे, चौकशी अधिकारी दरमहिन्याला येऊन वह्या तपासणं, या सगळ्या प्रक्रियेमुळे भ्रष्टाचार वाढेल असं मत व्यापार्‍यांनी नोंदवलंय. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याची प्रतिक्रियाही यावेळी व्यापार्‍यांनी नोंदवली.

close