बीसीसीआयने दिला इंग्लंड टीमला पुरेपूर मोबदला

January 1, 2009 7:58 AM0 commentsViews: 3

1 जानेवारी 2009 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही इंग्लंडची क्रिकेट टीम टेस्ट सीरिजसाठी भारतात परतली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या पुढाकाराचं खरं कारण बीसीसीआयकडे असलेला पैसा हेच असल्याचं आता सिद्ध झालंय.कारण, इंग्लंडमधल्या न्यूजपेपरनी दिलेल्या बातमीनुसार, इंग्लंड बोर्डाला त्या दौ-यासाठी पुरेपूर मोबदला मिळणार आहे. इंग्लंड आणि भारतीय क्रिकेट टीम दरम्यान अ‍ॅशेसच्या धर्तीवर नियमित टेस्ट सीरिज सुरू करण्याचा इंग्लिश बोर्डाचा प्रयत्न आहे. शिवाय आयपीएलच्या दुस-या हंगामातल्या काही मॅच इंग्लंडमध्ये खेळवण्याविषयी दोन्ही बोर्डांची चर्चा सुरू आहे. इतकंच नव्हे तर चॅम्पियन्स लीग या महत्त्वाच्या स्पर्धेच्या आयोजनातही यापुढे इंग्लिश बोर्डाचा सक्रिय पुढाकार असणार आहे. पुढची चॅम्पियन्स लीग स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवण्याचा डावही टाकला जात आहे.

close