पाकच्या जेलमध्ये सरबजीतवर जीवघेणा हल्ला

April 26, 2013 3:36 PM0 commentsViews: 21

26 एप्रिल

लाहोर : पाकिस्तानातील भारतीय कैदी सरबजित सिंग यांच्यावर जेलमध्येच हल्ला करण्यात आलाय. सरबजित सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. त्यांना लाहोरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार जेलमध्ये दुसर्‍या एका कैद्याशी झालेल्या भांडणानंतर सरबजीतला ही मारहाण करण्यात आली. सरबजीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यांने आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानला सरबजितला सर्व मदत करण्याची विनंती केली आहे. उच्चायुक्त कार्यालयातील दोन अधिकार्‍यांना सरबजितच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. 1990 मध्ये पंजाब प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सहभागाबद्दल सरबजीत पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत आहे.

close