कर्जमाफीमुळे बँकांना मिळाली नवं संजीवनी

January 1, 2009 8:20 AM0 commentsViews: 2

1 जानेवारी 2009 औरंगाबादसंजय वरकड केंद्र आणि राज्य सरकारनं शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली आणि शेतक-यांपेक्षा आनंद झाला तो जिल्हा सहकारी बँकाना.कारण डबघाईला आलेल्या बँकांना या कर्जमाफीमुळे संजीवनीच मिळणार आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच जिल्हा बँका डबघाईला आल्या होत्या. नांदेडची जिल्हा बँक तर दिवाळखोरीत निघालीय. पण शेतक•यांच्या कर्जमाफीमुळे या बँकाची परिस्थिती सुधारणार आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयराम साळुंखे सांगतात, कर्जमाफीचा फायदा जिल्हयातील 1 लाख 14 हजार शेतक-यांना होईल. भांडवल मिळाल्यानंतर बँका पुन्हा कर्ज वाटप करू शकेल. शेतक-यांनाही नवं कर्ज मिळेल.बँकिंगतज्ञ जगदीश भावठाणकर सांगतात, जिल्हा बँकाना हा पैसा सरकारकडून मिळणार असल्यानं त्यांचा जो एनपीए होता तो सुधारेल. या बुडणा-या बँका तगतील. पर्यायानं शेतक-यांनाही त्याचा लाभ होईल.केंद्र सरकारनं केलेल्या कर्जमाफीमुळं औरंगाबाद जिल्हा बँकेला 294 कोटी, तर राज्यसरकानं केलेल्या माफीमुळे 204 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या बँकेचा एकदम 500 कोटींचा फायदा झाला आहे. असाच फायदा अनेक डबघाईला आलेल्या बँकांनाही झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा औरंगाबाद जिल्ह्यात 2,80,000 शेतक-यांना झालाय. अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिले, पण बंद पडणा-या जिल्हा बँका मात्र सरकारच्या मदतीमुळे तरल्या आहेत.असं म्हणतात सारी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही. कर्जमाफीमुळे जिल्हा बँकांना फायदा झाला खरा, पण यापुढील काळात त्यांच्यापुढे खडतर आव्हानंही असणार आहेत.

close