औरंगाबादमध्ये 6 वर्षाच्या मुलाचा बसखाली चिरडून मृत्यू

January 1, 2009 10:56 AM0 commentsViews: 1

1 जानेवारी 2009 औरंगाबादशेखलाल शेखऔरंगाबाद शहरातल्या बेगमपुरा इथं एका 6 वर्षाच्या मुलाचा बसखाली चिरडून मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी बसची तोडफोड केली आणि ती जाळण्याचा प्रयत्न केला. निखिल जाधव असं या मुलाचं नाव आहे. औरंगपुरा ते गुरुनगर जाणा-या एएमटी बसमध्ये तो बसला होता. गाडीतून उतरल्यावर त्याच बसखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ड्रायव्हरनं तेथून पळ काढला. मात्र काही वेळातच पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

close