पुण्यात विकास आराखड्यावरून वाद सुरूच

April 27, 2013 9:50 AM0 commentsViews: 6

27 एप्रिल

पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये तब्बल 20 लाख चौरस फूट जागा निवासी करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. सुराज्य संघर्ष समितीचे निमंत्रक विजय कुंभार यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केली. मोकळ्या जागा, उद्यानं, टेकड्या, रुग्णालय, अशी आरक्षणं असलेल्या जागा सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी उपसूचना सादर करुन आणि आरक्षण बदलवून निवासी केल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला. पुण्याचा विकास आराखडा हा बिल्डरांचा आराखडा असल्याची तक्रार सर्वच थरातून झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेत या आराखड्यावरती हरकती घेण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे.

close