अश्वनीकुमारांच्या राजीनाम्याची शक्यता पंतप्रधानांनी फेटाळली

April 27, 2013 10:24 AM0 commentsViews: 7

27 एप्रिल

नवी दिल्ली : कोळसा खाण वाटप घोटळ्या प्रकरणी कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्याची शक्यता पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी फेटाळली. अश्वनीकुमार यांनी कोळसा खाण वाटपाची चौकशी करणार्‍या सीबीआयच्या अहवालात हस्तक्षेप करण्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरलंय. मात्र, संसदेचं कामकाज होऊ दिलं पाहिजे असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी लडाखमधली चीनची घुसखोरी ही स्थानिक समस्या आहे, ही समस्या सोडवता येण्याजोगी आहे असं पंतप्रधान म्हणाले. तसंच हा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडं काही योजना असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या 12 दिवसांपासून चीननं लडाखमध्ये घुसखोरी केल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांतले संबंध ताणले गेले आहे. दरम्यान, सरबजितवरचा हल्ला ही दुदैर्वी बाब असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

close